Wednesday, 9 March 2016

एकांताची घळ..


एकांताची घळ गवसली पण
असण्याचे भान टक्क जागे..!

एका बिंदूला..


एका बिंदूला हे घडले दर्शन
स्वयंभू नर्तन अवकाशी..!

Monday, 7 March 2016

ज्योतींचे झुंबर..


ज्योतींचे झुंबर बसले जागत
सुगंधी सोबत अंधाराला..!

निराधार धाव..


निराधार धाव तरी त्यात डौल
काळाला ही हूल जगण्याची..!


गंधकुप्या उद्या..


गंधकुप्या उद्या गंध सांडतील
रिकामे होतील गंधकोष..!

Sunday, 6 March 2016

कुणाची साधना..


कुणाची साधना अपुरी राहिली
योगमुद्रा झाली काष्ठशिल्प..!

थेंब थेंब त्यांनी..


थेंब थेंब त्यांनी जपलाय उरी
नभाला माघारी देण्यासाठी..!