Monday 23 May 2016

पाय नाही पंख..


पाय नाही पंख दिलेस दयाळा
देठात कशाला गुंतविले..?

Friday 20 May 2016

भय नाही त्याना..


भय नाही त्यांना अनंत काळाचे
फुलणे क्षणाचे पुरे आहे..!

अद्वैताचा बंध..


अद्वैताचा बंध तोडूनिया आल्या
द्वैताच्या पाकळ्या धरेवर..!

क्षणाची रांगोळी..


क्षणाची रांगोळी क्षणाच्या अंगणी
क्षणाची गृहिणी रेखतसे..!

शेंडा न बुडखा..


शेंडा न बुडखा अशा आठवणी
तुटलेली लेणी काळजात..!

Monday 9 May 2016

अंतर्बाह्य आता..


अंतर्बाह्य आता फुलली अबोली
वादळे निमाली राईतली..!



Sunday 8 May 2016

किती पावलांचे ठसे सोबतीला..



किती पावलांचे ठसे सोबतीला
किती धूळ उडवीत गेले पुढे
किती काळ गेला कळेना, परंतू
असावे तळाशी कळे एवढे..!


कोण फांदीवर..


कोण फांदीवर पहूडले शांत
अंगाई बुंध्यात गाते कोण?

Saturday 7 May 2016

दोन पक्षी नभी..


दोन पक्षी नभी एक खेळतोय
दुजा पाहतोय वरतून..!

Wednesday 27 April 2016

मांडली कोणी कुणाची..


मांडली कोणी कुणाची
ही स्वयंभू कुंडली
रिक्त आहे पूर्ण चौकट
मुक्त ती ग्रहमंडळी..!

ध्वस्त वास्तव भोवती पण


ध्वस्त वास्तव भोवती पण
जीवनेच्छा प्रकटली
खिन्नशा बुंध्यामधूनी
सांत्वना डोकावली..!



Thursday 21 April 2016

कोसळतानाही..


कोसळतानाही उंच केली मान
अस्तित्वाचे भान नृत्य झाले..!

Wednesday 20 April 2016

निराकार स्वये..


निराकार स्वये आले आकारास
सृजनाचा रास खेळावया..!

Monday 18 April 2016

सरला उपसा..


सरला उपसा उरली तहान
भुईचेही प्राण कासावीस..!
पाणी मागायला मुळे वर आली
दिठी आर्त झाली पाण्याविना..!

Saturday 9 April 2016

भूईतून वर..


भूईतून वर येताच बहर
अतर्क्य आहेर सृजनाचा..!


Wednesday 6 April 2016

गाली चंद्र-तीळ..


गाली चंद्र-तीळ गळा पाचू हार
काटेरी नकार डोळ्यांमध्ये..!

Wednesday 9 March 2016

एकांताची घळ..


एकांताची घळ गवसली पण
असण्याचे भान टक्क जागे..!

एका बिंदूला..


एका बिंदूला हे घडले दर्शन
स्वयंभू नर्तन अवकाशी..!

Monday 7 March 2016

ज्योतींचे झुंबर..


ज्योतींचे झुंबर बसले जागत
सुगंधी सोबत अंधाराला..!

निराधार धाव..


निराधार धाव तरी त्यात डौल
काळाला ही हूल जगण्याची..!


गंधकुप्या उद्या..


गंधकुप्या उद्या गंध सांडतील
रिकामे होतील गंधकोष..!

Sunday 6 March 2016

कुणाची साधना..


कुणाची साधना अपुरी राहिली
योगमुद्रा झाली काष्ठशिल्प..!

थेंब थेंब त्यांनी..


थेंब थेंब त्यांनी जपलाय उरी
नभाला माघारी देण्यासाठी..!

Saturday 5 March 2016

गळण्याचा क्षण..


गळण्याचा क्षण पानांनी झेलला
योगायोग झाला भावपूर्ण..!

Friday 4 March 2016

कुणी वाहतोय..


कुणी वाहतोय ओझे पुष्कळाचे
हाल दुष्काळाचे भोगे कुणी..!

बंदिवासाचेही..


बंदिवासाचेही भान नाही तिला
मृदंग आतला झंकारला..!

कोणत्याही क्षणी...


कोणत्याही क्षणी डौल झेपावेल
चित्र विस्कटेल पहाटेचे..!



Thursday 3 March 2016

उगवली अंती..


उगवली अंती अव्दैताची मिठी
कासावीस दिठी तृप्त झाली..!

सृजनाचा सोस..


सृजनाचा सोस सृष्टीला नावरे
फुटले धुमारे पाषाणाला..!

Wednesday 2 March 2016

गतकाल पूर्ण..


गतकाल पूर्ण वाकलाय आणि
वर्तमान पाणी प्रदूषीत..!

Monday 29 February 2016

उजाडले रंग..


उजाडले रंग दरवळे नाद
शुभ्रतेचा गंध रुणझुणे..!

रात्रीने जाताना..


रात्रीने जाताना प्राषिला अंधार
उजेडाला दार उघडले..!


Sunday 28 February 2016

गर्द मोहातून


गर्द मोहातून जन्म झाला तरी
वल्कले केशरी लाभलीत..!

मेघ खाली आले ..


मेघ खाली आले पाउले निघाली
कुणी हाक दिली पाय जाणे..!

Friday 26 February 2016

निर्मात्याच्या पुढे..


निर्मात्याच्या पुढे होऊन विनीत
जोडलेत हात निर्मितीने..!



तरंगांच्या सवे..


तरंगांच्या सवे तरंगे युगुल
सावळी चाहूल जळी-स्थळी..!

Thursday 25 February 2016

गच्च हिरवाई..


गच्च हिरवाई वर कोंदाटली
शुभ्र डोहातळी काही नाही..!

जगाकडे पाठ..


जगाकडे पाठ फिरवून गेला
बोधिसत्व झाला जगासाठी..!

देउनिया गेला..


देउनिया गेला उड्डाणाचा वसा
पेरून भरोसा पंखांमध्ये..!


Wednesday 24 February 2016

फुलांनी लावले..


फुलांनी लावले दिवे सभोवती
कशाला पणती शिळा म्हणे..!

चिंब निथळली..


चिंब निथळली ओली काया पण
आतली तहान माती जाणे..!

कळीतले नभ..


कळीतले नभ नभाला मिळाले
उमलणे झाले अर्घ्यदान..!

Tuesday 23 February 2016

धावता देखावा..


धावता देखावा थेंबांची आरास
आनंदाचा रास काचेआड..!

निराकारातून..


निराकारातून बिंब उगवले
जणू साकारले परब्रह्म..!

पाण्यात निवास..


पाण्यात निवास पाणी अन्न-पाणी
पाणी श्वास आणि प्राण पाणी..!

थेंब थेंब आयु..


थेंब थेंब आयु गोळा होत जाते
आणि ओघळते हाक येता..!

Friday 12 February 2016

कधी शिरच्छेद..


कधी शिरच्छेद कधी विष दिले
कधी चढविले क्रुसावर..!

कोणाचे हे मन..


कोणाचे हे मन इतके फुलले
लख्ख उजाडले अंतर्बाह्य..!

Thursday 11 February 2016

कोवळे काळीज..


कोवळे काळीज पंख मिटवून
झाले आत्ममग्न अवेळीच..!

बंद नेत्र जरी..


बंद नेत्र जरी बसले ध्यानस्थ
आतले पांथस्थ कौलावर..!