Monday, 23 May 2016

पाय नाही पंख..


पाय नाही पंख दिलेस दयाळा
देठात कशाला गुंतविले..?

Friday, 20 May 2016

भय नाही त्याना..


भय नाही त्यांना अनंत काळाचे
फुलणे क्षणाचे पुरे आहे..!

अद्वैताचा बंध..


अद्वैताचा बंध तोडूनिया आल्या
द्वैताच्या पाकळ्या धरेवर..!

क्षणाची रांगोळी..


क्षणाची रांगोळी क्षणाच्या अंगणी
क्षणाची गृहिणी रेखतसे..!

शेंडा न बुडखा..


शेंडा न बुडखा अशा आठवणी
तुटलेली लेणी काळजात..!

Monday, 9 May 2016

अंतर्बाह्य आता..


अंतर्बाह्य आता फुलली अबोली
वादळे निमाली राईतली..!



Sunday, 8 May 2016

किती पावलांचे ठसे सोबतीला..



किती पावलांचे ठसे सोबतीला
किती धूळ उडवीत गेले पुढे
किती काळ गेला कळेना, परंतू
असावे तळाशी कळे एवढे..!


कोण फांदीवर..


कोण फांदीवर पहूडले शांत
अंगाई बुंध्यात गाते कोण?

Saturday, 7 May 2016

दोन पक्षी नभी..


दोन पक्षी नभी एक खेळतोय
दुजा पाहतोय वरतून..!