प्रत्ययाचे बिंब
दृश्य - दोनोळी
Wednesday, 9 March 2016
एकांताची घळ..
एकांताची घळ गवसली पण
असण्याचे भान टक्क जागे..!
एका बिंदूला..
एका बिंदूला हे घडले दर्शन
स्वयंभू नर्तन अवकाशी..!
Monday, 7 March 2016
ज्योतींचे झुंबर..
ज्योतींचे झुंबर बसले जागत
सुगंधी सोबत अंधाराला..!
निराधार धाव..
निराधार धाव तरी त्यात डौल
काळाला ही हूल जगण्याची..!
गंधकुप्या उद्या..
गंधकुप्या उद्या गंध
सांडतील
रिकामे होतील गंधकोष..!
Sunday, 6 March 2016
कुणाची साधना..
कुणाची साधना अपुरी राहिली
योगमुद्रा झाली काष्ठशिल्प..!
थेंब थेंब त्यांनी..
थेंब थेंब त्यांनी जपलाय उरी
नभाला माघारी देण्यासाठी..!
Saturday, 5 March 2016
गळण्याचा क्षण..
गळण्याचा क्षण पानांनी झेलला
योगायोग झाला भावपूर्ण..!
Friday, 4 March 2016
कुणी वाहतोय..
कुणी वाहतोय ओझे पुष्कळाचे
हाल दुष्काळाचे भोगे कुणी..!
बंदिवासाचेही..
बंदिवासाचेही भान नाही तिला
मृदंग आतला झंकारला..!
कोणत्याही क्षणी...
कोणत्याही क्षणी डौल झेपावेल
चित्र विस्कटेल पहाटेचे..!
Thursday, 3 March 2016
उगवली अंती..
उगवली अंती अव्दैताची मिठी
कासावीस दिठी तृप्त झाली..!
सृजनाचा सोस..
सृजनाचा सोस सृष्टीला नावरे
फुटले धुमारे पाषाणाला..!
Wednesday, 2 March 2016
गतकाल पूर्ण..
गतकाल पूर्ण वाकलाय आणि
वर्तमान पाणी प्रदूषीत..!
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)