Monday, 29 February 2016

उजाडले रंग..


उजाडले रंग दरवळे नाद
शुभ्रतेचा गंध रुणझुणे..!

रात्रीने जाताना..


रात्रीने जाताना प्राषिला अंधार
उजेडाला दार उघडले..!


Sunday, 28 February 2016

गर्द मोहातून


गर्द मोहातून जन्म झाला तरी
वल्कले केशरी लाभलीत..!

मेघ खाली आले ..


मेघ खाली आले पाउले निघाली
कुणी हाक दिली पाय जाणे..!

Friday, 26 February 2016

निर्मात्याच्या पुढे..


निर्मात्याच्या पुढे होऊन विनीत
जोडलेत हात निर्मितीने..!



तरंगांच्या सवे..


तरंगांच्या सवे तरंगे युगुल
सावळी चाहूल जळी-स्थळी..!

Thursday, 25 February 2016

गच्च हिरवाई..


गच्च हिरवाई वर कोंदाटली
शुभ्र डोहातळी काही नाही..!

जगाकडे पाठ..


जगाकडे पाठ फिरवून गेला
बोधिसत्व झाला जगासाठी..!

देउनिया गेला..


देउनिया गेला उड्डाणाचा वसा
पेरून भरोसा पंखांमध्ये..!


Wednesday, 24 February 2016

फुलांनी लावले..


फुलांनी लावले दिवे सभोवती
कशाला पणती शिळा म्हणे..!

चिंब निथळली..


चिंब निथळली ओली काया पण
आतली तहान माती जाणे..!

कळीतले नभ..


कळीतले नभ नभाला मिळाले
उमलणे झाले अर्घ्यदान..!

Tuesday, 23 February 2016

धावता देखावा..


धावता देखावा थेंबांची आरास
आनंदाचा रास काचेआड..!

निराकारातून..


निराकारातून बिंब उगवले
जणू साकारले परब्रह्म..!

पाण्यात निवास..


पाण्यात निवास पाणी अन्न-पाणी
पाणी श्वास आणि प्राण पाणी..!

थेंब थेंब आयु..


थेंब थेंब आयु गोळा होत जाते
आणि ओघळते हाक येता..!

Friday, 12 February 2016

कधी शिरच्छेद..


कधी शिरच्छेद कधी विष दिले
कधी चढविले क्रुसावर..!

कोणाचे हे मन..


कोणाचे हे मन इतके फुलले
लख्ख उजाडले अंतर्बाह्य..!

Thursday, 11 February 2016

कोवळे काळीज..


कोवळे काळीज पंख मिटवून
झाले आत्ममग्न अवेळीच..!

बंद नेत्र जरी..


बंद नेत्र जरी बसले ध्यानस्थ
आतले पांथस्थ कौलावर..!

किती पूर्वजन्म..


किती पूर्वजन्म फिरून भेटली
हिरवी राहिली खुणगाठ..!

Wednesday, 10 February 2016

ऐकू आली त्यांना..


ऐकू आली त्यांना देठातली गाज
सडा होणे आज नाकारले..!

Monday, 8 February 2016

आड येती त्यांना..


आड येती त्यांना कापून काढले
विस्थापित केले पाखरांना..!

Sunday, 7 February 2016

किती शिल्पचित्रे..


किती शिल्पचित्रे मातीस मिळती
किती उगवती मातीतून..!

Saturday, 6 February 2016

कदंब-फुलांनी..


कदंब-फुलांनी मोहविले राना
राधेसह कान्हा आठवला..!

Friday, 5 February 2016

कुणी मांडलाय..


कुणी मांडलाय पट हा रानात
झाली काय मात खेळाविना..?

पंख पसरून..


पंख पसरून भक्ष्याच्या शोधात
निर्वाह नि घात एकावेळी..!

Wednesday, 3 February 2016

काळ्या मातीवर


काळ्या मातीवर हिरवे झुंबर
दंव पानांवर अळुमाळ..!


Monday, 1 February 2016

दृश्यांचा कल्लोळ


दृश्यांचा कल्लोळ पाण्याच्या काठाशी
प्रतिबिंबं कशी टाळणार..?